Description
सौंदर्य आणि श्रीमंती यांचे वरदान लाभलेल्या केसीला एक भरधाव कार उडवून लावते. केसी कोमात जाते; अंथरुणाला खिळते…. केसी पुन्हा भानावर येईल, तिचे पुढे काय होईल, अशा प्रश्नांचा विचार करत केसीचे जवळचे नातेवाईक व खास मित्रमैत्रिणी तिच्याभोवती येत-जात असतात; तिच्याविषयी बोलत असतात. शरीर निश्चल असलेल्या; पण मनाने भानावर असलेल्या केसीला; तिच्याविषयीच्या या बोलण्यातून अनेक रहस्ये उलगडायला लागतात… जीवनमरणाच्या सीमारेषेवर असलेल्या केसीला विलक्षण थरारक घटनाचक्रातून जावे लागते…. केसीची ही कथा केवळ रहस्ये उलगडत नाही, तर मानवी मनाचे कोपरे उत्कंठावर्धक शैलीत आपल्यासमोर उघडे करते.
Reviews
There are no reviews yet.