Description
शाळेतील शिक्षक खोली मधल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांमध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्कवितर्काना कसे तोंड फुटते ते पाहा “सुट्टी` या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं “निरोगी दवाखान्यात`… फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा “फर्स्ट क्लास वेटिंग रूम`मध्ये … तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्यायापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणाया माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा “निकाल`मध्ये.
Reviews
There are no reviews yet.