Description
वॉरन बफे या जगप्रसिद्ध गुंतवणूकदारानं, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराचं गूढ सहजपणे उलगडून त्यात मोठी झेप कशी घ्यायची, यासाठीचं मार्गदर्शन केलं आहे. मुख्य म्हणजे अगदी मजेशीर आणि कुणालाही समजेल अशा भाषेमधल्या दिलखुलास विधानांच्या आधारे त्यानं हे साधलं आहे. बफेच्या या विधानांना `मंत्र` असं इथं म्हटलं आहे. याचं कारण म्हणजे त्याचं प्रत्येक विधान खूप विचारांमधून, अनुभवांमधून आणि यश-अपयश यांच्या हिंदोळ्यांवर तरंगल्यानंतर तयार झालेलं आहे. यांमधील नेमकी ५० विधानं निवडण्याचा प्रयत्न इथं केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ५० विधानांचा इथं नुसता उल्लेख नाही, तर प्रत्येक विधानामध्ये दडलेला बपेÂचा विचार आणि काही वेळा खोडसाळपणा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एवूÂणच वॉरन बफेनं गुंतवणुकीच्या विश्वाला `ग्लॅमर` मिळवून दिलं, हे इथं आवर्जून सांगितलं पाहिजे. ‘गुंतवणूक म्हणजे जुगार नसून, नीट अभ्यास करून शांतपणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या माणसाला शेअर बाजारात यश मिळतंच,’ असा आत्मविश्वास त्यानं दिला आहे. अगदी छोट्या रकमांच्या गुंतवणुकीतूनसुद्धा अवाक करून सोडणारं यश गुंतवणूकदार शेअर बाजारात मिळवू शकतात. शेअर बाजार आणि गुंतवणूक यांच्याविषयी गैरसमजच जास्त पसरले आहेत. शेअर बाजाराविषयीची ही नकारात्मक मानसिकता काही अंशी मोडून काढण्यासाठी तरी अशा पुस्तकांचा उपयोग होईल.
Reviews
There are no reviews yet.