Description
·
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. श्याम भुर्के यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये यशाची अनेक उत्तुंग शिखरे गाठली. साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली. वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, रणजित देसाई, जगदीश खेबूडकर, राम गबाले, भीमसेन जोशी, शरद तळवलकर, सुरेश भट, वामनराव चोरघडे, प्रा. शिवाजीराव भोसले अशा अनेक नामवंतांसंबंधीच्या आठवणी आनंददायी आहेत. डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या समाजकार्यात सहभागी होता आले. खुमासदार अत्रे, पु.ल. एक आनंदयात्रा, नंदादीप–वि.स. खांडेकर, साहिाQत्यक सावरकर, गोनीदां–एक झंझावात, व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट, मिरासदारी, शरद तळवलकर–गुदगुल्या असे हजारो कार्यक्रम पत्नीसमवेत करून ज्येष्ठ लेखकांचे साहित्य व जीवन रसिकांपर्यंत पोहोचविले. असं हे आनंददायी घटनांचं समृद्ध लिखाण आहे. ज्याला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं, यशस्वी व्हावंसं वाटतं, आनंदी रहावं वाटतं; त्याला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल.
Reviews
There are no reviews yet.