Description
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचं यशस्वी नेतृत्व केलेले ख्यातकीर्त नेते म्हणजे विन्स्टन चर्चिल. जागतिक इतिहासात त्यांची कामगिरी कधी सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी, तर कधी विपरीत अर्थाने इतिहास घडवणारी ठरली. अशा या वादळी व्यक्तिमत्त्वाचा आलेख या पुस्तकामध्ये मांडला आहे. चर्चिल यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि वैयक्तिक जीवन या अपरिहार्यपणे एकमेकांमध्ये मिसळलेल्या वाटा होत्या. विन्स्टनच्या स्वभावाचे पडसाद त्यांच्या सार्वजनिक जीवनावर आणि पर्यायाने ब्रिटनच्या आणि उर्वरित जगाच्याही पटलावर कसे उमटले? याचा मार्मिक लेखाजोखा होम्स यांनी मांडला आहे.
Reviews
There are no reviews yet.