Description
हा संसार! इतकुसा, एवढासा! अनादि-अनंत काळापासून सुरू झालेला सांसार. ह्या संसारात अगणित लहान लहान संसार! ह्या संपूर्ण संसाराची, चराचराची समजा एक मोठ्ठी रेषा आखली ती रेषा म्हणजे काळाची रेषा! ह्या रेषेला प्रत्येकाच्या संसाराची एक रेषा, इवलीशी, तुटक-तुटक! खरं तर रेषा आखता येणारच नाह एखादं टिंबच द्यावं लागेल. त्या टिंबात शिरायचं. तो स्वत:चा संसार! त्यासाठी मग घर, अन्न, धान्य, कपडा-लत्ता, मुलं. मग मुलांची लग्नं. म्हणजे अजून एक टिंब तयार करायचं. त्यात जा-ये करायची. त्या टिंबाला स्वतंत्र आयुष्य द्यायचं नाही आणि आपलं टिंब सोडायचं नाही.
Reviews
There are no reviews yet.