Description
कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पारावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते, पण आम्हा माणसांना–माणसांनाच कशाला – माणसातल्या गंधर्वानाही तरी ही कुठं कळतं!ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामथ्र्य आमच्यात कुठलं!
Reviews
There are no reviews yet.