Sale!

GAVATI SAMUDRA by CONRAD RICHTER | Mehta Pub

96.00

  • Original Book Title: THE SEA OF GRASS
  • Availability : Available
  • Translators : SHANTA J SHELAKE
  • Edition : 3
  • Pages : 132
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-401 Categories: ,

Description

‘द सी ऑफ ग्रास’ या इंग्रजी कादंबरीचा ख्यातनाम कवयित्री आणि अभ्यासू लेखिका शान्ता शेळके यांनी केलेला ‘गवती समुद्र’ हा हृद्य अनुवाद आहे. ही साधी-सोपी गोष्ट आहे अमेरिकेतील सॉल्ट फोर्वÂ या गावातली. ल्यूटी कॅमेरॉन- जॉय ब्यू्रटन-जिम ब्य्रूटन या तीन प्रमुख पात्रांभोवती ही कथा गुंफली आहे. जॉय ही कथा आपल्याला निवेदन करतो. कर्नल जिम उंचापुरा- भारदस्त- शिस्तप्रिय- सर्वांवर करडा वचक असलेला सदगृहस्थ असतो. विस्तीर्ण पसरलेल्या गवताच्या कुरणात जॉयच्या काकाचा पशुपालनाचा व्यवसाय असतो. हे कुरण जिमने निर्वासितांच्या वसाहतीसाठी द्यावे, यासाठी कोर्टात केस सुरू असते. सरकारी वकील ब्राइस चेम्बरलेन याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे हे विशाल कुरण निर्वासितांच्या वसाहतीसाठी देण्यासंबंधी सूतोवाच केलेले असते. जॉयच्या काकाचे- कर्नल जिमचे- ल्यूटीशी लग्न होणार असते. ल्यूटी शिक्षणासाठी जॉयला शहरात पाठवण्याची व्यवस्था करते. त्यामुळे जॉयच्या मनात होणाऱ्या काकूविषयी गैरसमज निर्माण होतो. काकाच्या आदेशानुसार तो तिला आणायला रेल्वे स्टेशनवर जातो. ल्यूटीची साधी, सुंदर छबी आणि मनमोकळा स्वभाव पाहून जॉयच्या मनात तिच्याविषयी आदरयुक्त आकर्षण निर्माण होते. कुरणाविषयी कोर्टात सुरू असलेली केस सुरुवातीला कर्नल जिंकतो. दरम्यान कर्नल-ल्यूटीच्या संसारवेलीवर ब्रॉक-जिमी ही दोन मुले आणि सारा बेथ ही मुलगी अशी तीन फुले उमलतात. कर्नलचा कुरणावरील वसाहतीला विरोध पाहून ल्यूटी घर सोडण्याचा निर्णय घेते. आपले मातृवत छत्र दुरावल्यामुळे जॉयला दु:ख होते. कर्नल मात्र निर्धाराने हा धक्का पचवतो. बघता बघता १५ वर्षे उलटतात. कर्नलची मुले मोठी होतात. थोरला ब्रॉक बेफिकीर वृत्तीचा… आईसारखा देखणा असतो. त्याला जुगार आणि दारूचे व्यसन जडते. जॉय मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होतो. रुग्णांची सेवा करण्यासाठी तो गावी परततो. जुगाराच्या पबमध्ये झालेल्या भांडणात ब्रॉककडून एकाचा खून होतो. जज्ज झालेला चेम्बरलेन त्याला जामिनावर सोडवतो. चेम्बरलेन आणि ब्रॉकमधील साम्यामुळे ल्यूटी आणि चेम्बरलेन यांच्याविषयी प्रवाद निर्माण झालेला असतो. डॉ. जॉयला एका अत्यवस्थ रुग्णावर उपचारासाठी बोलावण्यात येते. तो ब्रॉक असतो. पुÂप्पुÂसात गोळी घुसल्यामुळे तो अखेरच्या घटका मोजत असतो. अचानक ल्यूटी परत येते. जॉयच्या दृष्टीने तो सुखद धक्का असतो. तिचा मुलगा ब्रॉक याच्या मृत्यूची बातमी तिला कशी सांगायची, कठोर काका कर्नलची ल्यूटी परत आल्यानंतरची प्रतिक्रिया कशी असेल, १५ वर्षे आपण कोठे होतो यावर ल्यूटीचे स्पष्टकरण कसे असेल, असे थरारक प्रश्न जॉयपुढे निर्माण होतात. पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी कवयित्री असलेल्या शान्ताबार्ईंच्या हळुवार लेखणीतून उतरलेली ‘गवती समुद्र’ ही कादंबरी वाचायला हवी… नातेसंबंधामधील गोडवा काव्यमय गद्यातून वाचकांना अनुभवायला मिळेल, यात शंकाच नाही…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “GAVATI SAMUDRA by CONRAD RICHTER | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.