Description
ग्यानबा हा एक आपलं उपजत कुतूहल दाबू न शकणारा तल्लख बुद्धीचा मुलगा. आपला परिसर न्याहाळत न्याहाळत त्याला पडणारे प्रश्न खरं तर कोणालाही विचार करायला लावणारेच. पण त्याच प्रश्नांची उत्तरं न देता आल्यामुळे किंवा त्यासाठी विचार करण्याची तयारी नसल्यामुळे त्या प्रश्नांना अंटसंट मानून त्याला खुळचट किंवा उद्धट ठरवण्याचीच घाई जो तो करत असे. त्याचे सवाल वरवर तिरपागडे वाटले तरी त्यापाठी खरोखरच काही तर्कसंगती आहे हे ओळखलं होतं ते फक्त गावात नव्यानंच आलेल्या दादासाहेब पंडितांनी. तेच त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्याचा प्रयत्न त्याच्यासोबतच करत. त्यापायी त्याला काही प्रयोग करायलाही उद्युक्त करत. त्यामुळेच इतरांना वेडपट किंवा मूर्ख वाटणारा ग्यानबा वेगळ्याच प्रकारे ज्ञान आत्मसात करायला लागला होता. त्याच्या आगळ्यावेगळ्या ज्ञानसाधनेच्या या कहाण्या आपल्याही अनेक प्रश्नांची उत्तरं देतील.
Reviews
There are no reviews yet.