Description
तुमच्या शेजार्यांना एक मुलगा आहे. आता तो पस्तीस वर्षांचा आहे. त्याच्या वयावरून तुम्हाला वाटेल की, तो उमदा तरुण असणार. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना भेटल्यावर तुम्ही अगदी सवयीनं विचारणार, ‘‘तुमचा मुलगा काय करतो?’’ पण ‘उमदा तरुण’ हा तुमचा शब्दप्रयोग इथे योग्य ठरणार नाही, कारण तो तरुण मुलगा अजून लहान मुलासारखाच आहे. पिता, म्हणजे जर ‘तो’ – THE FATHER… यातसुद्धा ‘टी’ आणि ‘एफ’ ही दोन्ही अक्षरं ‘कॅपिटल’ आणि ‘इटॅलिक्स’मध्ये असं असेल तर? हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बर्याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो?
Reviews
There are no reviews yet.