Description
शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र कादंबरीचा विषय. या चरित्राइतके सर्वांगसुंदर चरित्र आजवर इतिहासाने पाहिलेले नाही. असा या चरित्राचा लौकिक. बारा मावळांत स्वराज्याचे रोपटे रुजते न रुजते, तोच अफझलखानाचे संकट अवतरले. वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या हिरव्यागर्द रानावर राजकारणाचा पट मांडला गेला. चढे घोडियानिशी राजांना पकडून नेण्याची अफझलखानाची गर्वोक्ती होती; आणि खानास मारल्याविना राज्य साधणार नाही, हे राजे पुरे जाणून होते. या दोन राजकारणधुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजेच ‘लक्ष्यवेध’.
Reviews
There are no reviews yet.