Description
आशयाला धक्का न लावता केलेली प्रतिकृती. महाकवि श्रीकालिदास याचे “मेघदूत” ही संस्कृत साहित्यातली एक स्वभावरमणीय अलौकिक कलाकृती आहे. “मन्दाक्रान्ता” सारखे रसोचित वृत्त, प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे, विरहाच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची सुश्लिष्ट शैली यांमुळे “मेघदूता”ला अम्लान टवटवीत लावण्य लाभले आहे. मराठीत “मेघदूता”चे अनेक अनुवाद झाले आहेत. आता प्रसिद्ध कवयित्री शान्ता ज. शेळके या आपला अनुवाद रसिकांना सादर करीत आहेत. साधी सरळ निवेदनपद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, मूळ काव्याच्या रसवत्तेला बाध न आणता किंवा आशयाला ढका न लावता केलेली त्याची प्रतिकृती हे शान्ताबाईच्या अनुवादाचे लक्षणीय विशेष आहेत. “मेघदूता”च्या रसलुब्ध प्रेमिकांना तर हा अनुवाद आवडेलच, पण स्वतंत्रपणे वाचणारांनाही तो आस्वाद्य वाटेल.
Reviews
There are no reviews yet.