Description
या प्रश्नांचा शोध घेताना मार्शिया यांच्या असं लक्षात आलं की, मुळातच या स्त्रिया त्यांच्या आत अशांत असल्याने त्या आतल्या कोलाहलातच धडपडत राहतात. त्यामुळे त्यांच्या तणावाचं व्यवस्थापन हा मुख्य प्रश्न नसून त्या कोण आहेत, आणि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, हे प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या शोधातूनच या पुस्तकाची र्नििमती झाली आहे. या पुस्तकामध्ये अशा स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खरी उदाहरणं देऊन त्यांच्या आधारे, स्त्रीदेखील कशी यशस्वी होऊ शकते हे पटवून दिलं आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या आतली शांतता आणि स्व-ओळख प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मानसिक व्यायाम आणि प्रत्यक्ष करून बघायचे कृती-कार्यक्रमही यात दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्त्रियांना उद्देशून लिहिलं असलं, तरी ते पुरुषांनीही मर्मदृष्टी देईल, हे नक्की.
Reviews
There are no reviews yet.