Description
हत्येतही जातीची उतरंड असते. विकी रायचा, एका अत्यंत प्रतिष्ठित मंत्र्याच्या मुलाचा त्यानेच आयोजित केलेल्या झगमगत्या पार्टीत खून होतो. पार्टीला आलेल्या पाहुण्यांपैकी एकाने हा खून केला आहे. सगळे पाहुणे अतिशय प्रतिष्ठित; पण त्यात पोलिसांना सहा अशा त-हेवाईक व्यक्ती आढळतात ज्यांच्याकडे पिस्तूल होते आणि मनात विकी रायच्या हत्येची छुपी, पण धगधगती प्रेरणा! भारतातील एक नामवंत शोधपत्रकार अरुण अडवाणी याने खुनी कोण याचा छडा लावण्याचे व्रतच घेतले आहे! या प्रयत्नामध्ये आपल्यासमोर उलगडत जातो, तो त्या सहा व्यक्तींच्या आयुष्याचा बहुरंगी, कधी सुन्न करणारा, तर कधी मन हेलावणारा जीवनपट! पण अडवाणी तरी विश्वासार्ह आहे? का काही वेगळा हेतू, अजेंडा त्याच्याही मनात आहे? समकालीन भारताच्या बहुरंगी समाजजीवनाचे सुन्न चकित करणारे चित्रण!
Reviews
There are no reviews yet.