Description
दूर देशाहून आलं होतं एक गोरं पाखरू. पळून आलं होतं. तुटलं होतं माणसांपासून… मातृभूमीपासून… जगण्यापासूनच! मागावर असलेले पोलीस आणि स्वत:च्या डागाळलेल्या आयुष्याची लाज वाटणारं मन यापासून त्याला पळून जायचं होतं… लपून राहायचं होतं.ते उतरलं होतं मुंबईत. अंधारी, काळी, कलकलाटाची दुनिया. पिचलेली… तरीही ताठ उभ्या कण्याची! क्षणात नरडीचा घोट घेणारी, क्षणात प्रेमाची पाखर घालून पोटाशी कवटाळणारी दुनिया! घर सुटलेलं, कुटुंब तुटलेलं, जिवलग दुरावलेले, अशा शून्य अवस्थेत भिरभिरणारं ते एकुट पाखरू शिरलं मुंबईच्या कुशीत. – आणि बघता बघता सारं बदललं. एक नवीच दुनिया उलगडत गेली. प्रेमाचा पाऊस… द्वेषाचा जाळ… विश्वासघाताचे सुरे… रहस्यांचं चक्रव्यूह आणि गुपितांच्या गुहा! शरीरसुखाच्या उफाळत्या लाटांवर नाचणारा उत्कट प्रणय आणि तुरुंगाच्या अंधारकोठडीतला रक्तरंजित छळ. जगण्याच्या लढाईत धगधगणा-या झोपड्या आणि पंचतारांकित हॉटेलातलं थंडगार ऐश्वर्य. अंडरवल्र्डमधल्या टोळीयुद्धांच्या चिखलात रुजलेली तत्त्वज्ञानाची कमळं आणि बॉलीवुडच्या झगमगाटाआडचा सुन्न अंधार. या कहाणीत काय नाही? तिच्या पोटाशी आहे पंखांवर खिळे ठोकणा-या नियतीला झुगारून, जगण्याचा अर्थ शोधत भिरभिरणारं एक पाखरू, त्याच्या पंखांवरचे प्रेमाचे रंग आणि एक शहर – मुंबई.
Reviews
There are no reviews yet.