Description
काही काही माणसांची स्मृती इतकी विलक्षण असते, की ती मोठमोठ्या कविता न अडखळता घडाघड म्हणू शकतात; किंवा वेगवेगळे तपशील, आकडे, नावं त्यांच्या अगदी चपखल लक्षात राहतात. या माणसांचा तुम्हांला हेवा वाटतो का? आपलीही स्मृती चांगली असावी, सगळ्या गोष्टी आपल्या अगदी छान, दीर्घकाळ आणि स्पष्ट स्मरणात राहाव्यात, असं तुम्हांलाही वाटतं का? या पुस्तकात तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणाया अशा काही झटपट, पण हमखास पद्धतींचा कानमंत्र सांगितलेला आहे. माणसाला जीवनात ज्या गोष्टी स्मरणात ठेवणं आवश्यक असतं, त्या स्मरणात ठेवण्यासाठी आणि स्मृतीला सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी या पद्धती हमखास यशस्वी ठरतात. वाईट किंवा कमकुवत स्मृती नावाची चीजच अस्तित्वात नसते, या विश्वासाच्या पायावर हे पुस्तक आधारलेलं आहे. अनेक लोक आपल्या स्मृतीला दोष देतात; परंतु त्यांची स्मृती वाईट नसते, तर तिला योग्य प्रशिक्षण दिलं गेलेलं नसतं, हे त्याचं मूळ कारण आहे. अनंत पैज्यांना आपण पैकाका म्हणून ओळखतो, त्यांनी आपल्या ‘अमर चित्रकथा’ या हास्यकथामालिकेतून आपल्या देशातील अनेक प्राचीन दंतकथा जिवंत केल्या आणि मुलं आणि पालकदोघांनाही मंत्रमुग्ध केलं. व्यक्तिमत्त्वविकासाला प्रेरणा देणारं लेखन करणारे लेखक म्हणूनही यांची ख्याती आहे. ‘यशाचा कानमंत्र’ आणि ‘आत्मविश्वासाचा कानमंत्र’ ही याच मालिकेतील त्यांची पुस्तकंही संग्राह्य आहेत.
Reviews
There are no reviews yet.