Description
प्रत्येक दीर्घ नि:श्वासावर विस्तृत टीका आणि स्पष्टीकरणे दिली जात होती. विभेला हे सगळे आणखी सहन होईना, म्हणून ती निसटून बागेत आली होती. सूर्य आज ढगांआडूनच उगवला होता, ढगांआडच अस्तास गेला होता. दिवस कधी मावळला आणि संध्याकाळ कधी झाली, ते समजले नाही. संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सोनेरी रेषा उमटली होती, पण दिवस मावळताना ती विरून गेली. अंधार घनदाट होऊ लागला होता. दशदिशा झाकोळून गेल्या होत्या. ओळीने असलेल्या सुरूच्या दाट बनांतून फांद्यांच्या वर इतका अंधार दाटला की, फांद्या एकमेकींत मिसळून गेल्या अन् सहस्र लांबलचक पायांवर भार देऊन प्रचंड विस्तृत नि:स्तब्ध अंधार त्यावर रेलला आहे, असे वाटत होते. हळूहळू रात्र होऊ लागली. राजवाड्यातले दिवे एकेक करून मालवले गेले.
Reviews
There are no reviews yet.